जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्य सरकारने शेतकऱ्यांना खुशखबर दिली. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळाल आहे.
येत्या 3 दिवसात दुधाचे दर वाढवणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
2 ते 3 दिवसात दुधाचे नवे दर घोषित करुन, शेतकऱ्यांना दिलासा देऊ. असं राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटल आहे.