जय महाराष्ट्र न्यूज, महाबळेश्वर
महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणातील हवेतील आर्द्रता कमी असल्याने स्ट्रॉबेरीचं उत्पादन अत्यंत उच्च दर्जाचा असल्याचं सिद्ध झालंय. आतापर्यंत बाजारपेठेत इतर कोणत्याही ठिकाणची स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वर स्ट्रॉबेरी म्हणून विकली जात होती.
मात्र, आता अखिल भारतीय स्ट्रॉबेरी उत्पादक महासंघाच्या माध्यमातून महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला राष्ट्रीय दर्जाचे G I म्हणजेच जॉबरिकल इंडेक्स नामांकन मिळाल्याने ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
तसेच, पाचगणीतील भिलारे येथे महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्यानं देशभरातील पर्यटक शेतावर चक्क मोफत स्ट्रॉबेरी खाण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.