जय महाराष्ट्र न्यूज, सातारा
महाबळेश्वर येथील लिंगमळा परिसरातील जंगलात सुरू असणाऱ्या रेव्ह पार्टीवर धाड टाकून पोलिसांनी तरूण-तरूणींना ताब्यात घेतले आहे.
लिंगमळ्याच्या जंगलात बुधवारी रात्री ही पार्टी सुरू होती. या पार्टीत सहभागी झालेले बहुतेक तरूण-तरुणी या उच्चभ्रू वर्गातील आहेत.
पोलीस आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा तरूण-तरूणी याठिकाणी गाण्यांवर बिभत्सपणे नृत्य करत होते. यावेळी आठ युवकांना दोन तरूणींसह ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी या सगळ्यांच्या रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत.