मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये सभा घेतल्यानंतर भोंग्यावरून तीन तारखेचा अल्टिमेटम दिला आहे. मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. आज हनुमान जयंती निमित्त मनसेकडून दादर येथील आगार बाजार मधील हनुमान मंदिरात महाआरती केली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. ‘मशिदींवरील भोंगे उतरवा’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर त्यांनी ठाण्यात जाहीर उत्तरसभा घेतली. मनसेच्या उत्तरसभेतही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. ईदपूर्वी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास सांगितले आहेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान, मशिदींवरील भोंगे उतरवण्याची आमची भूमिका मागे घेणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. अशातच, सभेत तलवार उंचवल्यामुळे ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी मविआवर निशाणा साधला असून मविआमधील नेत्यांवर टीकेची झोड उठवली. याप्रकरणी राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत.