‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018’ परिषदेच्या समारोप समारंभात मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांची उपस्थीती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018’ महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मितीसाठी देश-विदेशातील विविध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्य सरकारसोबत तब्बल 12 लाख 10 हजार 464 कोटंची रक्कम यात गुंतवली आहे. यात  4106 सामंजस्य करार केले असून त्यातून 36 लाख 77 हजार 185 रोजगार उत्पन्न झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या […]

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018’ परिषदेच्या समारोप समारंभात मुख्यमंत्र्यांसह बड्या नेत्यांची उपस्थीती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र 2018’ महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक प्रगती व रोजगार निर्मितीसाठी देश-विदेशातील विविध कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्य सरकारसोबत तब्बल 12 लाख 10 हजार 464 कोटंची रक्कम यात गुंतवली आहे. यात  4106 सामंजस्य करार केले असून त्यातून 36 लाख 77 हजार 185 रोजगार उत्पन्न झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या समारोप समारंभात जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई महानगरपालिका यांसारख्या सरकारी उपक्रमांच्या 104 प्रकल्पांमधून 3 लाख 90 हजार 419 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून दोन लाख सहा हजार २७६ जणांना रोजगार मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८ परिषदेचा समारोप समारंभ मंगळवारी सायंकाळी पार पडला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह रेल्वेमंत्री पीयूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि वरिष्ठ  अधिकारी उपस्थित होते. गुंतवणूकदारांनी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या मागास भागांतही मोठय़ा प्रमाणात रस दाखवल्याने आता या भागांचाही विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगीतले आहे.

संरक्षण व अंतराळ उद्योगांसाठी राज्य सरकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number