लॅब टेस्टमध्ये मॅगी पुन्हा एकदा फेल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रॅण्ड मॅगी लॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा फेल झालाय. मॅगी लॅब टेस्टमध्ये फेल झाल्यानं उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर  जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावलाय. यात नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. तर, तीन वितरकांना 15 लाख आणि दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावलाय. लखनौतील जिल्हा प्रशासनाने 2015 […]

लॅब टेस्टमध्ये मॅगी पुन्हा एकदा फेल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

नेस्ले इंडियाचा लोकप्रिय ब्रॅण्ड मॅगी लॅब टेस्टमध्ये पुन्हा एकदा फेल झालाय. मॅगी लॅब टेस्टमध्ये फेल झाल्यानं उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर  जिल्हा प्रशासनाने नेस्ले इंडिया आणि वितरकांना दंड ठोठावलाय.

यात नेस्ले इंडियाला 45 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. तर, तीन वितरकांना 15 लाख आणि दोन विक्रेत्यांना 11 लाखांचा दंड ठोठावलाय.

लखनौतील जिल्हा प्रशासनाने 2015 मध्ये ‘मॅगी’चे 7 नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. 2016 मध्ये याबाबत अहवाल आला होता. या आधारे प्रशासनाने स्थानिक न्यायालयात खटला दाखल केला होता. ‘मॅगी’मध्ये प्रमाणापेक्षा जास्त शिस सापडल्याने न्यायालयाने नेस्लेला नुकताच दंड ठोठावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number