Madhuri Elephant : माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार! वनताराच्या केंद्रासाठी परवानगी तर आरोग्याबाबत मोठा दिलासा

कोल्हापुरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या हायपावर कमिटीसमोर सुनावणी सुरू होती.

Madhuri Elephant : माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार! वनताराच्या केंद्रासाठी परवानगी तर आरोग्याबाबत मोठा दिलासा

कोल्हापुरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या हायपावर कमिटीसमोर सुनावणी सुरू होती. 28 नोव्हेंबरनंतर 15 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला वनतारातून पुन्हा नांदणी मठात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा- Mumbai Local Train: उरण-नवी मुंबई मार्गावर 10 नव्या लोकल ट्रेन्स; प्रवाशांना मोठा दिलासा

एचपीसी, न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने संयुक्त प्रस्ताव सादर केला गेला. नांदणी मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या असून बांधकामाच्या 7 टप्प्यात मंजुरी देण्यात आली आहे. तसेच यासाठी 12 कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. तसेच नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीणी यांच्या नातेसंबंधाबद्दलही सुनावणीत महत्वपूर्ण चर्चा झाली.

हेही वाचा- Bombay HC on Mumbai Air : उच्च न्यायालयाला मुंबईकरांची काळजी, म्हणाले, 'यावर तोडगा…

माधुरी हत्तीणीच्या आरोग्याबाबत बोलायच झालं तर पुन्हा एकदा केलेल्या तपासणीनुसार माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली. त्यामुळे नांदणी येथे उभारण्यात येणाऱ्या हत्ती पुनर्वसन केंद्राच्या कामाला गती येणार असून माधुरी हत्तीण परत येण्याचा मार्गही मोकळा होत आहे. त्याचसोबत या केंद्राची सोयीसुविधा कशाप्रकारे देणार याचीही माहिती उच्चस्तरीय समितीला द्यावी लागणार आहे. त्यानंतर दिलेल्या माहितीचा विचार करून माधुरी हत्तीण परतण्याचा पुढील निर्णय अपेक्षित आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number