Madh-Versova Bridge:वाहतूक कोंडी सुटणार! मढ-वर्सोवाकरांचा प्रवास आता सुखकर होणार, ‘या’ पुलाचे काम अखेर मार्गी

मेट्रो 3 वरळी स्थानक ते समुद्रकिनाऱ्यादरम्यान भुयारी पादचारी मार्गही बांधण्यात येणार आहे.

Madh-Versova Bridge:वाहतूक कोंडी सुटणार! मढ-वर्सोवाकरांचा प्रवास आता सुखकर होणार, ‘या’ पुलाचे काम अखेर मार्गी

मुंबई: मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठे पाऊल उचलले आहे. मढ आणि वर्सोवा या दोन महत्त्वाच्या परिसरांना जोडणाऱ्या खाडीवरील भव्य पुलाच्या बांधकामाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले प्राथमिक सर्वेक्षण आणि जमिनीचे माती परीक्षण सुरू झाले असून, येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.

मढ-वर्सोवा दरम्यान सध्या प्रवाशांना लांबचा फेरा मारून रस्ते मार्गाने सुमारे 20 किमी अंतर पार करावे लागते. या प्रवासासाठी साधारणपणे 90 मिनिटांचा वेळ खर्च होतो. मात्र, हा नवीन पूल कार्यान्वित झाल्यानंतर हे अंतर केवळ 2.6 किमी इतकेच उरेल. परिणामी, 90 मिनिटांचा हा त्रासदायक प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल. यामुळे इंधन आणि वेळ या दोन्हीची मोठी बचत होणार आहे.

हेही वाचा: Donald Trump: ‘अमेरिका फर्स्ट’चा प्रभाव; फार्मा कंपन्यांशी ट्रम्प यांचा ऐतिहासिक करार

मुंबई महानगरपालिकेने या पुलाचा आराखडा तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, कंत्राटदाराचीही नियुक्ती केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने मंजुरी दिली होती, तर नुकतीच CRZ कडूनही परवानगी मिळाली आहे. सुमारे 2395 कोटी रुपये खर्चून उभारला जाणारा हा पूल मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहे. हा मार्ग मढ जेट्टी रोडपासून सुरू होऊन वर्सोवा येथील फिशरीज युनिव्हर्सिटी रोडजवळ जोडला जाईल.

केवळ रस्तेच नव्हे, तर मेट्रो प्रवाशांच्या सुविधेसाठीही मुंबईत आधुनिक बदल केले जात आहेत. कुलाबा-वांद्रे या 'मेट्रो 3' मार्गिकेवरील वरळी येथील विज्ञान केंद्र स्थानकापासून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी 1518 मीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग बांधला जाणार आहे. सध्या प्रवाशांना स्थानकातून समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी सुमारे 5 किमीचा फेरा पडतो, जो या भुयारी मार्गामुळे टाळता येईल.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRCL) या भुयारी पादचारी मार्गासाठी 531 कोटी 33 लाख रुपये खर्च करणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला 24 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 'मेट्रो 3' ही 33 किमी लांबीची पूर्णतः भुयारी मेट्रो असून, हा नवीन पादचारी मार्ग वरळी सी-फेस आणि समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या पर्यकांसाठी आणि स्थानिक रहिवाशांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा: Cyclonic Wind Situation: कडाक्याची थंडी आणि दाट धुके; उत्तर भारतात रेड अलर्ट, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात गारठा वाढणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number