LPG Gas price and New Rule: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलेंडर बुक करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम; दरही घसरले

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडर संबंधित महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. तर बुधवारी 1 जुलैपासून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे.

LPG Gas price and New Rule: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! सिलेंडर बुक करण्यापूर्वी जाणून घ्या नवे नियम; दरही घसरले

दर महिन्याच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसेल अशा अनेक आर्थिक नियमांमध्ये बदल केले जातात. अशातच जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलिंडर संबंधित महत्त्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. बुधवारी 1 जुलैपासून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात 183.50 रुपयांची कपात करण्याचा निर्णय पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला आहे. तर पाच किलोच्या लहान गॅस सिलेंडरच्या दरातही 13 रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

आखाती युद्धाचा मोठा फटका व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरकर्त्यांना झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. बऱ्याच कालावधीनंतर आता व्यावसायिकांसाठी किंचित दिलासा ठरणार आहे. तर दुसरीकडे 1 जुलै 2026 पासून एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम इंडेन, भारत गॅस आणि एचपी गॅस या सरकारी तेल कंपन्यांची सिलिंडर बुकिंग, डिलिव्हरी प्रक्रिया आणि पीएनजी सेवांबाबत लागू केले आहेत. त्यामुळे तुम्ही सिलिंडर बुक करणार असाल, तर हे नवीन नियम नक्की वाचा….

हेही वाचा- Fuel Price: जुलैच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या नवीन दर

LPG बुक करण्याआधी 'हे' नियम वाचा

1. सिलिंडर घेण्यासाठी OTP अनिवार्य : 1 जुलैपासून एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी 'ओटीपी व्हेरिफिकेशन' अनिवार्य करण्यात आले आहे. जर तुम्ही 'ओटीपी व्हेरिफिकेशन' केले नाही तर तुमचे सिलिंडर बुक होणार नाही. यासाठी सिलिंडर बुक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल यानंतर तुमचा सिलिंडर बुक होईल. अनेकदा असं होत की, सिलिंडर बुक केल्यानंतर डिलिव्हरी बॉय दाराजवळ आल्यावर आपल्याला पावती सापडत नाही. त्यामुळे सिलिंडर बुक केला असला तरी तो घेण्यासाठी अडथळे निर्माण होतात. अशावेळेस पावती हरवली असली तरी तुमच्या फोनमध्ये असलेला ओटीपी दाखवत सिलिंडर घेता येणार आहे. 

2. सिलिंडरसाठी देखील e-KYC बंधनकारक : सरकारने अनेक योजनांसाठी e-KYC करणे अनिवार्य केले आहे. मात्र ज्या ग्राहकांनी अद्यापही e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांची सबसिडी रोखली जाऊ शकते. ही सबसिडी थेट ग्राहकांच्या e-KYC लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होते. त्यामुळे सबसिडी सुरू ठेवण्यासाठी त्वरित e-KYC करणे आवश्यक आहे.

3. सिलिंडरसाठी PNG कनेक्शन अॅक्टिव्ह ठेवावे लागणार : ज्या कुटुंबांकडे पीएनजी कनेक्शन आहे आणि तरीही त्यांनी एलपीजी सिलिंडर ठेवला आहे, अशा ग्राहकांना आपले पीएनजी कनेक्शन अॅक्टिव्ह ठेवावे लागणार आहे. तर, 30 दिवसांच्या आत घरातील एलपीजी सिलिंडर गॅस एजन्सीकडे जमा करावा लागणार आहे. सिलिंडर जमा केल्यावर त्यांना एक 'ट्रान्सफर व्हाउचर' दिले जाईल. भविष्यात जर ग्राहक इतरत्र शिफ्ट झाला आणि तिथे पीएनजी सेवा नसेल, तर या व्हाउचरचा वापर करून पुन्हा एलपीजी कनेक्शन मिळवता येईल.

4. पीएनजी बिल भरले नाही, तर कनेक्शन खंडित होणार : जर पीएनजी ग्राहकाने सलग 2 महिने गॅसचे बिल भरले नाही, तर त्याचे कनेक्शन तात्काळ खंडित केले जाऊ शकते. बिल पूर्ण भरल्यानंतरच कनेक्शन पुन्हा सुरू केले जाईल. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number