सध्या आखाती युद्धाचा परिणाम भारतातील स्वयंपाकघरावर झालेला दिसून येत आहे. सुरूवातीला LPG गॅस नोंदणी कालावधीमध्ये बदल केला. त्यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारने ठरवले आहे. घरगुती वापराचा गॅस सिलेंडर नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे.त्यामुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे.
घरगुती वापराचा गॅस सिलेंडर 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. त्याचप्रमाणे जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत.
हेही वाचा – Iran Israel Conflict: धक्कादायक! ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेल? इराणची खेळी पाहून अमेरिकेची चिंता वाढली
गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले होते. सरकारने वारंवार आवाहन करुनही नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळणार की नाही, याबाबत धास्ती कायम आहे.
गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजीसाठी गॅस पुरवठा बंद केला होता. त्यामुले हॉटेल इंडस्ट्रीवर गंडांतर ओढवले होते. मात्र, आता मध्यपूर्वेतील (इराण-इस्त्रायल) युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.