पुण्यात धनगर कुटुंबातील मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’

पुणे : पुण्यात धनगर कुटुंबातील मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’चा प्रकार घडल्याचा प्रकार उघडकीस आला. चार वर्षापूर्वी मुसलमान तरूणाने एका हिंदू मुलीला फूस लावून पळवून नेले, असा आरोप भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. या चार वर्षांत पीडित मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले. बीफ खाऊ घातले. तिला नमाज पडण्यास सांगितले. तिला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिच्या अंगावर […]

पुण्यात धनगर कुटुंबातील मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’

पुणे : पुण्यात धनगर कुटुंबातील मुलीसोबत ‘लव्ह जिहाद’चा प्रकार घडल्याचा प्रकार उघडकीस आला. चार वर्षापूर्वी मुसलमान तरूणाने एका हिंदू मुलीला फूस लावून पळवून नेले, असा आरोप भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. या चार वर्षांत पीडित मुलीला बुरखा घालण्यास भाग पाडले. बीफ खाऊ घातले. तिला नमाज पडण्यास सांगितले. तिला गैरप्रकार करण्यास भाग पाडले. तिच्या अंगावर सिगारेटचे चटके दिले आहेत. तिला वारंवार झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यामुळे हे प्रकरण लव्ह जिहादचेच असल्याचा दावा भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये या गुन्ह्याची नोंद करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हे जोडपे मंचरमध्ये परतले. त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

 

तब्बल चार वर्षानी दोघेही मंचरमध्ये परतले

22 मे 2019 ला हे दोघे मंचर सोडून गेले होते. त्यावेळेस मुलीच्या कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र तिचा शोध लागत नव्हता. या तरूण – तरूणीने चार वर्षे महाराष्ट्रासह सुरत आणि उत्तरप्रदेशात काढली. या 4 वर्षामध्ये त्या दोघांनी  या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काम करून उदरनिर्वाह केला. या दरम्यान मुलीला 18 वर्षे पुर्ण झाली  आणि मग दोघांनी कोर्ट मॅरेज करत निकाहनामा केला. त्यानंतर तब्बल चार वर्षानी ते मंचरमध्ये परतले.

 

जावेदला येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले आहे

मंचरमध्ये परतल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांना ती गावात आल्याचं समजलं., त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर   पोलिसांनी मुलीला बोलावून घेतले मुलीच्या बोलण्यातून हा संपूर्ण  प्रकार समोर आला. तसेच मुलीची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. हा घडला प्रकार कळताच  पोलिसांनी जावेदला अटक केली. सध्या जावेद येरवडा तुरुंगात आहे. जावेदवर  कलम 376 सह कलम 363 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले गेले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number