Internet Viral Story: सायबर तज्ज्ञ थकले, आता मानसोपचारतज्ज्ञांचा आधार! एक पासवर्ड आणि 6500 कोटी रुपये पणाला, नेमकं काय झालं?

पुढच्या प्रयत्नात चुकीचा पासवर्ड ठरला तर ही संपत्ती कायमची नष्ट होऊ शकते.

Internet Viral Story: सायबर तज्ज्ञ थकले, आता मानसोपचारतज्ज्ञांचा आधार! एक पासवर्ड आणि 6500 कोटी रुपये पणाला, नेमकं काय झालं?

आजच्या डिजिटल जगात आपण साध्या ईमेलचा पासवर्ड विसरलो तरी डोक्याला हात लावतो. पण कल्पना करा, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती तब्बल 6500 कोटी रुपये एका डिजिटल लॉकरमध्ये ठेवले असतील आणि तुम्ही त्याचा पासवर्डच विसरलात तर? ऐकूनच अंगावर काटा आला ना? पण ही कोणती काल्पनिक कथा नसून, अमेरिकेतील उद्योजक स्टेफन थॉमस (Stefan Thomas) यांच्या आयुष्यातील अंगावर शहारे आणणारी वस्तुस्थिती आहे.

स्टेफन थॉमस यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. मेहनत आणि दूरदृष्टीच्या जोरावर त्यांनी 7000 पेक्षा अधिक बिटकॉईन्स जमा केले. आजच्या जागतिक बाजारपेठेतील मूल्यानुसार, या बिटकॉईन्सची किंमत 6 हजार 500 कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र, ही अफाट संपत्ती ज्या 'आयर्न की' (IronKey) नावाच्या डिजिटल वॉलेटमध्ये सुरक्षित आहे, त्याचा 'पासवर्ड' स्टेफन यांच्या स्मृतीतून पुसली गेली आहे.

हेही वाचा: Digvijay Singh: "RSS च्या ताकदीमुळेच स्वयंसेवक पंतप्रधान होतो…" दिग्विजय सिंहांच्या पोस्टने काँग्रेसमध्ये खळबळ; नेमकं प्रकरण काय?

हे डिजिटल वॉलेट एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखे आहे. यात पासवर्ड टाकण्यासाठी फक्त 10 संधी दिल्या जातात. जर अकरावा प्रयत्न चुकला, तर हे वॉलेट स्वतःमधील सर्व डेटा कायमचा 'डिलिट' करते. स्टेफन यांनी आतापर्यंत तब्बल आठ वेळा चुकीचे पासवर्ड टाकून आपले नशीब आजमावले आहे, पण यश मिळालेले नाही. आता त्यांच्याकडे फक्त दोन शेवटच्या संधी शिल्लक आहेत. या दोन प्रयत्नांत जर योग्य पासवर्ड लागला नाही, तर 6500 कोटींची ही संपत्ती एका क्षणात शून्यावर येईल.

हे संकट इतके मोठे आहे की, जगभरातील सायबर तज्ज्ञांनी हे वॉलेट क्रॅक करण्याचे दावे केले आहेत. 'Unciphered' सारख्या मोठ्या सुरक्षा कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला, परंतु 6500 कोटींचा जुगार खेळण्याची स्टेफन यांची सध्या तयारी नाही.

आश्चर्य म्हणजे, आता ते मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेत असून, आपल्या 'सुप्त मनातून' (Subconscious Mind) तो हरवलेला पासवर्ड पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तंत्रज्ञान जिथे संपते, तिथे आता मनाच्या सामर्थ्याची चाचणी सुरू आहे. एका पासवर्डमुळे एका करोडपतीची अवस्था 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी झाली आहे.

हेही वाचा: Rampur Accident : भयंकर! भुसा भरलेला ट्रक बोलेरोवर उलटला, चालकाचा जागीच मृत्यू, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number