कारनामा सहकारमंत्र्यांच्या कारखान्याचा; मनस्ताप गरीब शेतकऱ्यांना

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर   सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने एका मजुराच्या नावानं 15 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावानं हे कर्ज कॅनरा बँकेच्या सोलापूर शाखेतून उचलण्यात आले.   शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार करूनही कोणतीही कारवाई करत नसल्याचं दिसून आले. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी […]

कारनामा सहकारमंत्र्यांच्या कारखान्याचा; मनस्ताप गरीब शेतकऱ्यांना

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापुर

 

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या लोकमंगल साखर कारखान्याने एका मजुराच्या नावानं 15 लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस

आला आहे.

 

येळेगाव येथील शेतकरी कल्याणराव मेंडगुदले यांच्या नावानं हे कर्ज कॅनरा बँकेच्या सोलापूर शाखेतून उचलण्यात आले.

 

शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार करूनही कोणतीही कारवाई करत नसल्याचं दिसून आले. याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी विजापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंद्रूप येथे रास्ता

रोको आंदोलन करण्यात आले.

 

साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळावर कारवाई करण्यात यावी. तसेच सुभाष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी

केली.

 

हे आंदोलन माजी सभापती अप्पाराव कोरे याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आंदोलनास मोठा संख्येनी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number