लोकमान्य टिळकांच्या या सहा घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा लखनौ येथे 29 डिसेंबर 1916 साली काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष लोकमान्य टिळक यांनी केली होती. या घटनेला 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्तरप्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे आज आयोजन केले होते. उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभास […]

लोकमान्य टिळकांच्या या सहा घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी घोषणा लखनौ येथे 29 डिसेंबर 1916 साली काँग्रेसच्या अधिवेशनात अध्यक्ष लोकमान्य टिळक यांनी केली होती. या घटनेला 101 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्तरप्रदेश सरकारने लखनौतील लोकभवनात एका विशेष सोहळ्याचे आज आयोजन केले होते.

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभास आयोजित करण्यात आला. या समारंभास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, डॉ. दिनेश शर्मा, रिता बहुगुणा-जोशी, पुण्याच्या महापौर श्रीमती मुक्ता टिळक यांनी यावेळी उपस्थिती लावली.

स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते, लोकमान्य अशा उपाधीने ज्‍यांचा उल्‍लेख केला जातो ते बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य टिळकांनी दिलेला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे,’ या घोषणेने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलण्यासह आत्मविश्वास दिला.जुलमी ब्रिटिश राजवटीला उलथून टाकण्याचा भारतीयांमध्ये जोष जागा केला.

lokmany1.jpg

lokmanya2.jpg

lokmanya3.jpg

lokmanya4.jpg

lokmanya5.jpg

महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्वसाची सुरुवात केली. विविध दैनिक आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी आपल्या लेखनीतून लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवून लावण्याची शक्ती त्यांनी दिली.

lokmanya6.jpg

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number