‘लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीत’

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : देशात राज्यात २०२४ हे वर्ष निवडणुकीचे रणसंग्राम ठरणार आहे. या वर्षात राज्यात महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका होणार आहेत. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, अशी […]

‘लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीत’

मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : देशात राज्यात २०२४ हे वर्ष निवडणुकीचे रणसंग्राम ठरणार आहे. या वर्षात राज्यात महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका होणार आहेत. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाही, अशी स्पष्टोक्ती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकींवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कुठलीही शक्यता नाही. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका भाजपा संपूर्ण ताकदीने जिंकू आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागून त्याही जिंकू.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मविआवर निशाणा साधला. वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत. कुणी कुठे उभे रहायचे, कुणी कुठे बसायचे यावर अधिक चर्चा सुरू आहेत. या नेत्यांबद्दल राष्ट्रवादीद अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात विस्तृतपणे लिहिले आहे, त्यामुळे त्यावर बोलणार नाही. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पोपट मेला आहे, हे पूर्णपणे कळले आहे. तरीही तो मान हलवतो आहे, त्याचे हातपाय हलताहेत, असे त्यांना बोलावे लागते. कारण, त्यांना तसा संदेश त्यांच्या लोकांना द्यायचा आहे, अशी टीका फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

तसेच, राज्य सरकारने पुण्यातील प्रकल्पांना ११०० कोटींचा निधी दिलेला आहे. यात कात्रज-कोंडवा रस्ता सुद्धा आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०० कोटी रुपये दिले आहे. जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यावर एकत्रितपणे विचार करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number