जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेमध्ये मुली, महिला सुरक्षित नाहीत हे आता पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सीएसटीवरुन कल्याणला जाणाऱ्या ट्रेन मधून 14 वर्षीय मुलगी प्रवास करत होती.
ती असलेल्या डब्यामध्ये अचानक एक पुरुष चढला. त्या व्यक्तीने मुलीला तु गप्प बस असं सांगितलं. भीतीने घाबरुन तिने ट्रेन थांबवण्याकरता साखळी खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेन थांबत नसल्याचं पाहून तिने घाबरुन चालत्या ट्रेन मधून उड़ी मारली.
पायल खांबे असं या मुलीचं नाव आहे. दरम्यान पीडित मुलीवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पायाला, कमरेला आणि डोक्याला मार लागलाय.
धावत्या लोकलमध्ये चढलेला हा तरुण तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागल्यानंतर तिनं उडी मारल्याची माहिती मुलीच्या आईनं दिली. सकाळच्या सुमारास पायल खांबे ट्यूशनला ट्रेनने निघाली असता हा सर्व प्रकार घडलाय.
या सर्व घटनेमुळे महिला डब्ब्यात पोलिसकर्मी नसल्याचं उघड झालय.