वाळूज मध्ये उसन्या पैश्यातून निर्माण झाला वाद ;किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण करून बलात्काराची धमकी

वाळूज, संभाजीनगर येथे उसन्या पैशाच्या वादातून किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण, मुलीवर बलात्काराची धमकी; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सात आरोपींवर गुन्हा दाखल.

वाळूज मध्ये उसन्या पैश्यातून निर्माण झाला वाद ;किराणा दुकानदार व दोन मुलांचे अपहरण करून बलात्काराची धमकी

छत्रपती संभाजीनगर: वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उसन्या पैशाच्या वादातून एका किराणा दुकानदाराचे आणि त्याच्या दोन मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, उसन्या पैशांची परतफेड केली नाही, तर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याची धमकीही देण्यात आली. या संपूर्ण घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा कट उधळून लावला आहे.

38 वर्षीय तक्रारदार किराणा दुकानदाराने आपल्या तक्रारीत नमूद केले की, व्यवसायासाठी त्याने खासगी सावकार वैभव बिहारीलाल जैस्वाल आणि प्रशांत विलास डांगे यांच्याकडून 10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु काही आर्थिक अडचणींमुळे तो पैसे परत करू शकला नाही. याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी तक्रारदाराच्या घरी येऊन मारहाण केली आणि त्याच्या दोन मुलांसह अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा:यवतमाळमध्ये मका लागवडीतील फसवणूक; 35 शेतकऱ्यांचे 120 एकरातील पीक वाया

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव जैस्वाल, प्रशांत डांगे, गणेश डगळे, ओमकार पोपळघट, कुणाल पोपळघट, परीघाबाई डांगे आणि जयश्री जैस्वाल यांनी तक्रारदाराच्या घरात घुसून जोरजबरदस्ती केली. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण करत मुलीला बलात्काराची धमकी देत अपहरण केले. पीडित कुटुंबाच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चौकशी करून सातही आरोपींवर गुन्हा दाखल केला.

यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, दोन महिलांना नोटीस देऊन पुढील चौकशीसाठी सोडण्यात आले आहे. पोलिसांचा तपास सुरु असून, आरोपींनी केलेल्या धमक्यांचा आणि त्यांच्या मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर वाळूज परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासगी सावकारीमुळे कित्येक नागरिक अडचणीत आले असून, या प्रकारावर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही केवळ उसन्या पैशाची वसुली नसून, एक नियोजित कट होता. अल्पवयीन मुलींना लक्ष करत धमकावणे हा गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केल्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number