नवरात्रीच्या तोंडावर, भारनियमनाचं संकट महाराष्ट्राच्या जनतेवर !

ऑक्टोबर हिटने लोकांचा जीव मेटाकुटीला आला असतानाच आता नवरात्रीच्या तोंडावर, ऐन सणासुदीच्या काळात राज्यावर भारनियमनाचं संकट येऊन ठेपलंय. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दूसरीकडे कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झालाय. त्यामुळे राज्यात आजपासून अनेक भागात लोडशेडींगला सुरुवात झाली आहे. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातले 2100 मेगावॅट विजनिर्मिती संच बंद पडले आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात […]

नवरात्रीच्या तोंडावर, भारनियमनाचं संकट महाराष्ट्राच्या जनतेवर !

ऑक्टोबर हिटने लोकांचा जीव मेटाकुटीला आला असतानाच आता नवरात्रीच्या तोंडावर, ऐन सणासुदीच्या काळात राज्यावर भारनियमनाचं संकट येऊन ठेपलंय. तापमान वाढल्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. दूसरीकडे कोळश्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे विद्युतनिर्मितीवर परिणाम झालाय. त्यामुळे राज्यात आजपासून अनेक भागात लोडशेडींगला सुरुवात झाली आहे.

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातले 2100 मेगावॅट विजनिर्मिती संच बंद पडले आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात तूट निर्माण झाली आहे.  त्यामुळे सध्या जी 1,2,3 या गटात भारनियम सुरु झालंय.

यामध्ये प्रामुख्याने विद्युत गळती होत असलेला विभागाचा समावेश आहे. 700 ते 800 मेगावॅटचा तुटवडा सध्या आहे, तूट वाढल्यास राज्यात इतर भागातही टप्याटप्यात लोडशेडिंग सुरू करावं लागणार आहे,

का होत आहे लोडशेडींग?

विद्युतनिर्मितीसाठी कोळश्याचा तुटवडा

कोळश्याच्या तुटवड्यामुळे 2100 मेगावॅट विजनिर्मिती संच ठप्प

ऑक्टोबर हीटमुळे विजेच्या मागणीत वाढ

कोयना धरणातून विद्युतनिर्मितीला मर्यादा

राज्याबाहेर वीज दर महागलेत

शेतीपंपांच्या वापरात वाढ

सध्या 700 ते 800 मेगावॅट विजेचा तुटवडा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number