Chhatrapati Sambhajinagar : भाजीत शिजलेली पाल; वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, काहींना उलट्या तर काहींनी…

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चक्क विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये शिजलेली पाल आढळून आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar : भाजीत शिजलेली पाल; वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली, काहींना उलट्या तर काहींनी…

विजय चिडे, प्रतिनिधी 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे चक्क विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये शिजलेली पाल आढळून आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील किलेअर्क परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात सायंकाळच्या जेवणात पाल निघाल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले. या धक्कादायक प्रकारानंतर जेवण केलेल्या विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला आहे. या प्रकरणी तब्बल 28 विद्यार्थ्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी वसतिगृहात आंदोलन छेडले होते. विद्यार्थ्यांनी बोलावल्यावर सहायक आयुक्त रवींद्र शिंदे वसतिगृहात दाखल झाले. 

चक्क विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाल आढळून आली होती. यापूर्वी देखील अनेक वेळा जेवणही निकृष्ट दर्जाचा येत असल्याचं ही विद्यार्थ्यांनी यावेळी म्हणलं होतं. ताटामध्ये शिजलेली पाल आढळून आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मेस चालक बदलण्यात यावा, अशी मागणी करत युनिट नंबर एकच्या विद्यार्थ्यांनी रात्रीच आंदोलन सुरू केले. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी आपल्या भूमिकेवरच ठाम राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक हजार मुलांच्या वसतिगृह संकुलात चार युनिट आहेत. प्रत्येक युनिट हे 250 विद्यार्थी क्षमतेचे आहे. युनिट नंबर एकमधील विद्यार्थी नेहमीप्रमाणे रात्रीच्या जेवणासाठी मेसमध्ये गेले. 80 टक्के विद्यार्थ्यांचे जेवण झाले होते. उर्वरित 20 टक्के विद्यार्थी जेवत होते. तेव्हा भाजी घेत असताना एकाच्या पळीत (मोठा चमचा) शिजलेली पाल आली. हे पाहताच जेवणासाठी बसलेल्या विद्यार्थ्यांत खळबळ उडाली. काहींनी उलट्या केल्या, तर अनेक विद्यार्थी मेस सोडून बाहेर पडले.

हेही वाचा : 26/11 Mumbai Terrorist Attack : 17 वर्षांनंतरही जखमा अजून ताज्या; ‘नेव्हर फर्गेट, नेव्हर फर्गिव्ह’ची देशवासियांची भावना

काही विद्यार्थ्यांनी गृहपाल धनेधर व वर्शीळ यांना फोन केला. तर काहींनी चक्क सहायक आयुक्त रवींद्र शिंदे यांनाच वसतिगृहात घडलेला प्रकार सांगितला. शिंदे तातडीने वसतिगृहात दाखल झाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत त्यांना घेराव घातला. त्यानंतर मळमळ झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच दवाखान्यात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून औषधोपचार केले व त्यांना परत पाठविले. यावेळी सहायक आयुक्त शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी मेसमध्ये निकृष्ट जेवण दिले जाते. मेसचालकांकडे जेवणाची तक्रार केल्यास ते दादागिरी करतात. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. अंघोळ व कपडे धुण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, असे गाऱ्हाणे मांडले. संतप्त विद्यार्थ्यांनी तब्बल दीड तासांहून अधिक वेळ शिंदे यांना अडवून ठेवले होते.

तपास करून ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र या संपूर्ण घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील अन्नपुरवठ्याच्या व्यवस्थेतील बेफिकिरी आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number