शाळेतील धान्यात पाली आणि अळ्या

येवला, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: शालेय मुलांना चांगला पोषण आहार मिळावा, यासाठी शासन अनेक शाळांना धान्य पुरवत असते. मात्र अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येवला तालुक्यातील ममदापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पोषण आहारासाठी धान्य साठवले होते. यातील तांदूळ साठ्यात पाली, अळ्या आणि जळमटे आढळली. […]

शाळेतील धान्यात पाली आणि अळ्या

येवला, २९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: शालेय मुलांना चांगला पोषण आहार मिळावा, यासाठी शासन अनेक शाळांना धान्य पुरवत असते. मात्र अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येवला तालुक्यातील ममदापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात पोषण आहारासाठी धान्य साठवले होते. यातील तांदूळ साठ्यात पाली, अळ्या आणि जळमटे आढळली.

ग्रामस्थांनी धान्यात पाली आढळल्याचे कळताच संताप व्यक्त करत शाळेला कुलूप ठोकले आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातच अशी परिस्थिती असेल तर बाकी ठिकाणच्या शाळांची काय परिस्थिती असणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number