एनटीएन२४ टीव्ही या वृत्तवाहिनीवर लाइव्ह भाषण करताना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर शनिवारी ड्रोन हल्ला झाला. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले असून सात जण जखमी झाले आहेत.
मादुरो हे व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये शेकडो सैनिकांसमोर लाइव्ह भाषण करत होते. ड्रोनमध्ये स्फोटकं भरुन राष्ट्रपतींना लक्ष्य करण्याच्या दृष्टीनेच हा हल्ला करण्यात आला होता. एक ड्रोन उडत त्यांच्याजवळ आलं आणि त्यातून काही विस्फोटकं खाली पडली. विस्फोटक पडलेल्या ठिकाणापासून निकोलस थोडे लांब उभे असल्याने ते यातून बचावले. मात्र, तिथे उभे असलेले सात जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत, अशी माहिती व्हेनेझुएलाचे माहिती आणि प्रसारण मंत्री जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली आहे.
एनटीएन२४ टीव्ही या वाहिनीने हल्ल्यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
#VIDEO ¿Atentado o accidente? Aparente explosión en acto de Maduro genera confusión https://t.co/U4bhFp2xJy pic.twitter.com/xTNPGvlUcn — NTN24 Venezuela (@NTN24ve) August 5, 2018