भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती राज्यभरात उत्साहात साजरी

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी साजरी होणारी जयंती ही केवळ एका महापुरुषाची आठवण नाही, तर एका विचारप्रणालीचा उत्सव आहे. बाबासाहेब हे गौतम बुद्ध, महात्मा फुले आणि संत कबीर यांच्या समतेच्या तत्वांनी प्रेरित होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक समतेसाठी लढा दिला

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील उत्सव 

सांगली
शास्त्री चौकात अभिवादनाचा सन्मान:
सांगली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. शास्त्री चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला जयंती महोत्सव मंडळाच्या अध्यक्षा स्नेहल सावंत यांच्या हस्ते पुष्पमालार्पण करून अभिवादन करण्यात आलं.

सिंधुदुर्ग
धाग्यांतून विणलेली बाबासाहेबांची प्रतिमा:
मालवण येथील वराडकर हायस्कूलमधील विद्यार्थीनी श्रेया समीर चांदरकर हिने रंगीत धाग्यांचा उपयोग करून बाबासाहेबांची अप्रतिम प्रतिमा विणली. एक अनोखा कलाविष्कार म्हणून ही कलाकृती सर्वत्र चर्चेत आली आहे.

धुळे
ढोल-ताशांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी:
जयंतीनिमित्त माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांच्या उपस्थितीत जल्लोषात कार्यक्रम पार पडला. रात्री ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि केक कापून जल्लोष साजरा करण्यात आला.

हेही वाचा: इंदू मिलमध्ये साकारतंय प्रेरणास्थानाचं भव्य रूप, थर्माकॉल मॉडेलचं काम पूर्ण; कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?

धाराशिव (उमरगा)
वाचन संस्कृतीसाठी रथयात्रा:
प्रा. शामराव चव्हाण स्मृती वाचनालय व ॲड. शीतल चव्हाण फाउंडेशनच्या वतीने उमरगा शहरात ‘वाचन संस्कृती जागर रथयात्रा’ काढण्यात आली. यामध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी संदेश देण्यात आला.

बीड (आष्टी)
बुद्धविहारात भव्य कार्यक्रम:
विध्दविहार येथे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. या वेळी माजी आमदारांचाही सहभाग होता. आष्टी येथे आमदार धस यांच्या निधीतून ५ कोटी रुपयांचा सुंदर बुद्धविहार उभारण्यात आला आहे.

नाशिक
कोलंबिया विद्यापीठाची प्रतिकृती:
नाशिकच्या सीबीएस परिसरात बाबासाहेबांच्या पुतळ्याभोवती कोलंबिया विद्यापीठाची प्रतिकृती उभारण्यात आली. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यापीठाचा हा देखावा आकर्षणाचं केंद्र बनला.

जळगाव
रेल्वे स्थानकाबाहेर जनसागर उसळला:
जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी पहाटेपासूनच भीमसैनिकांनी गर्दी केली. बहुजन वॉलेंटियर फोर्सच्या वतीने मानवी साखळी आणि अभिवादन कार्यक्रम राबवण्यात आला.

हेही वाचा: इंदू मिलमध्ये साकारतंय प्रेरणास्थानाचं भव्य रूप, थर्माकॉल मॉडेलचं काम पूर्ण; कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?

कराड (डाकेवाडी)
कलिंगडावर बाबासाहेबांची प्रतिमा:
चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी कलिंगडावर बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली. याआधी त्यांनी विविध माध्यमांतून बाबासाहेबांची चित्रे काढली आहेत, पण फ्रुट कार्व्हिंगच्या माध्यमातून साकारलेली ही कलाकृती विशेष चर्चेत आहे.

अमरावती
रात्री बारा वाजता जल्लोष:
इर्विन चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ हजारो अनुयायांनी गर्दी केली. रात्री बारा वाजताच प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीने जयंतीचा जल्लोष गगनात भिडला.

भंडारा
रोषणाईने उजळले सामाजिक न्याय भवन:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीला रंगीबेरंगी रोषणाई करण्यात आली. इमारतीवर झगमगाट करून उत्सवाचे औचित्य साधण्यात आले.

अशा विविध पद्धतीने, संपूर्ण महाराष्ट्राने बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सलाम करत, संविधानाचा व त्यांच्या विचारांचा जागर केला.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number