मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होत आहेत. गोरेगाव येथील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीचे कनेक्शन उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात काल अटक करण्यात आलेली जिया जेकब फिल्म इंडस्ट्रीत साईड ॲक्टर (सहकलाकार) म्हणून काम करते. अभिनयासोबतच ती मॉडेलिंगही देखील करते.
Goregaon Drug Case : गोरेगाव नेस्को ड्रग्सप्रकरण! ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी खळबळ; ‘ड्रग्ज क्वीन’ला अटक
तपासात असेही समोर आले आहे की, जिया जेकबच्या बँक खात्यात लाखों रुपयांचे व्यवहार (ट्रांजॅक्शन्स) झाले आहेत. नेस्को ड्रग्ज प्रकरणातील इतर आरोपींनी ही रक्कम तिच्या खात्यात पाठवली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. जिया जेकबचा अंमली पदार्थांच्या पुरवठ्यातही हात असू शकतो, असा पोलिसांना संशय आहे. सध्या तिची चौकशी सुरू असून, या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये झालेल्या संगीत कार्यक्रमादरम्यान दोन एमबीए विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणात वनराई पोलिसांनी बुधवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. 33 वर्षीय जिया जेकब हिला उल्हासनगर येथून अटक करण्यात आली असून, ती या प्रकरणातील अकरावी आरोपी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य ड्रग्स पुरवठादार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयुष साहित्याच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत असताना जिया जेकबचे नाव समोर आले. यानंतर पोलिसांनी तिची चौकशी करून बुधवारी (22 एप्रिल 2026) सायंकाळी अटक केली. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून संपूर्ण ड्रग्स साखळी उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.