जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
लातुरमध्ये लिंगायत समाजाच्या वतीने रविवारी महामोर्चा काढण्यात आला. लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा
मिळावा, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अश्या विविध मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात सुमारे दोन लाख
लोक सहभागी झाले. अत्यंत शिस्तबद्ध आणि स्वयंसेवकांचे योग्य नियोजन या मोर्चात पहायला मिळाले.
लिंगायत समाजाच्या या मोर्चाला मराठा क्रांती मोर्चा आणि मुस्लिम समाजासह इतर 55 सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत शिवलिंग
शिवाचार्य महाराज यांनी केले. लहानांपासून ते वृद्धांपर्यंतचा गट या मोर्चात सहभागी झाला होता.