सुट्टीसाठी ‘ती’ महिला झारखंडहून पुण्याला आली पण कल्पनाही करु शकत नाही असं विपरीत घडलं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   पिंपरी चिंचवडमध्ये एका ज्येष्ठ महिलेला सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्टमुळे जीव गमवावा लागलाय. निलिमा चौधरी असं या महिलेचं नाव आहे. निलिमा  सुट्टीसाठी चौधरी झारखंडहून पिंपळे सौदागर इथे मुलाकडे आल्या होत्या. 23 ऑक्टोबर रोजी त्या लिफ्टमधून जात होत्या. मात्र, अचानक चालू लिफ्टचं दार उघडलं. भीतीने त्या लिफ्टच्या दारात पडल्या आणि दोन मजल्यांना जोडणारा […]

सुट्टीसाठी ‘ती’ महिला झारखंडहून पुण्याला आली पण कल्पनाही करु शकत नाही असं विपरीत घडलं

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पिंपरी चिंचवडमध्ये एका ज्येष्ठ महिलेला सोसायटीच्या बिल्डिंगमधील लिफ्टमुळे जीव गमवावा लागलाय. निलिमा चौधरी असं या महिलेचं नाव आहे.

निलिमा  सुट्टीसाठी चौधरी झारखंडहून पिंपळे सौदागर इथे मुलाकडे आल्या होत्या. 23 ऑक्टोबर रोजी त्या लिफ्टमधून जात होत्या.

मात्र, अचानक चालू लिफ्टचं दार उघडलं. भीतीने त्या लिफ्टच्या दारात पडल्या आणि दोन मजल्यांना जोडणारा स्लॅब त्यांच्या डोक्यावर पडलाय.

निलिमा चौधरी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केलंय. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलंय.

या दुर्घटनेमागे सोसायटीने या लिफ्टचं मेन्टेनन्स ठेवलं नसावं, किंवा मेन्टेनन्स काम करणाऱ्यांचा हलगर्जीपणा असावा. मात्र पीडब्लूडीकडून येणाऱ्या अहवालातून हे सगळं स्पष्ट होईल. हा अहवाल येत्या दोन-तीन दिवसात येणं अपेक्षित आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number