Nashik Lift Accident : ‘माझी आई गेली…’, मुलाची आर्त किंकाळी; कर्मचारी महिलेवर कोसळली मेडिकल कॉलेजची लिफ्ट, मुलानं केला बघ्यांच्या गर्दीसमोर आक्रोश

नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात झाला आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर लिफ्ट पडल्याची घटना घडली आहे.

Nashik Lift Accident : ‘माझी आई गेली…’, मुलाची आर्त किंकाळी; कर्मचारी महिलेवर कोसळली मेडिकल कॉलेजची लिफ्ट, मुलानं केला बघ्यांच्या गर्दीसमोर आक्रोश

नाशिकच्या एमव्हीपी मेडिकल कॉलेजमध्ये लिफ्टचा अपघात झाला आहे. नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर लिफ्ट पडल्याची घटना घडली आहे. या अपघातादरम्यान मेडिकल कॉलेज मधील महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. या गंभीर घटनेत ज्योती अहिरे नामक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली असून उपचार सुरू आहेत. ज्योती अहिरे या दैनंदिन प्रमाणे लिफ्टमध्ये वस्तू ठेवण्याचं त्यांच काम करत असताना लिफ्ट महिलेच्या अंगावर कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. घटनास्थळावरील परिस्थिती बघून मुलाने धाव घेत आक्रोश केला. लिफ्ट कोसळल्याच्या घटनेनंतर मेडिकल कॉलेज परिसरात खळबळ माजली असून मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. तर आडगाव पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number