आरोग्य मंत्रालयाचे पाच राज्यांना पत्र

चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे कोरोना निर्बंध हटवण्यात आले. मात्र, निर्बंध मुक्तीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला असून आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे केंद्रीय […]

आरोग्य मंत्रालयाचे पाच राज्यांना पत्र

चीन आणि अमेरिकेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे कोरोना निर्बंध हटवण्यात आले. मात्र, निर्बंध मुक्तीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सतर्कतेचा इशारा दिला असून आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पाच राज्यांना पत्र लिहिले आहे.

कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव राकेश भूषण यांनी शुक्रवारी हरियाणा, दिल्ली, केरळ, महाराष्ट्र आणि मिझोराम या पाच राज्यांना पत्र लिहून सतर्कतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असली तरी काही राज्यांमध्ये त्याची संख्या सातत्याने वाढते आहे. कोरोना काळात लादलेले निर्बंध उठवल्याने आता राज्यांमधील जनजीवन सुरळित होऊ लागले आहे. अशावेळी रुग्णवाढ ही चिंतेची बाब असून त्यासाठी ठोस उपाय राबवण्याची गरज असल्याचेही भूषण यांनी म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत, केरळमध्ये ३५३, महाराष्ट्रात ११३, हरियाणामध्ये ३३६ आणि मिझोराममध्ये १२३ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number