मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपती महोदयांना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. या उपक्रमांतर्गत मराठी भाषा विभागाच्यावतीने साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात […]

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रपतींना पत्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मराठी भाषा विभागाच्यावतीने राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पत्रमोहिमेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपती महोदयांना पत्र पाठवून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली. या उपक्रमांतर्गत मराठी भाषा विभागाच्यावतीने साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मराठी ही प्राचीन भाषा असून ती राजभाषा, ज्ञानभाषा, महानुभावी धर्मभाषा आणि लोकभाषा समजली जात असून जागतिक भाषांमधील अग्रणी भाषा आहे. तसेच या मराठी भाषेचे पुरावे अद्यापही शाबीत असून, मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषेला दर्जा देण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

तसेच, २००४ साली भारत सरकारने भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची लेखी शिफारस एकमताने करण्यात आली आहे. या शिफारसला सात वर्षे होऊन गेली, त्यामुळे साहित्य अकादमीने केलेली ही शिफारस ताबडतोब अंमलात येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number