निश्चित पाचवी जागा निवडून आणू – देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेसाठी निवडणुकीत भाजपा पाच जागा लढवणार आहेत. पाचव्या जागेसाठी आम्ही आराखडे तयार केले आहेत. पाचवी जागा जिंकणे सोप नाही, मात्र पाचवी जागा जिंकणारच, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहाव्या जागेवर सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही कालावधी शिल्लक असताना सदाभाऊ […]

निश्चित पाचवी जागा निवडून आणू – देवेंद्र फडणवीस

विधानपरिषदेसाठी निवडणुकीत भाजपा पाच जागा लढवणार आहेत. पाचव्या जागेसाठी आम्ही आराखडे तयार केले आहेत. पाचवी जागा जिंकणे सोप नाही, मात्र पाचवी जागा जिंकणारच, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहाव्या जागेवर सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही कालावधी शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तारूढ पक्षात खूप मोठा अनरेस्ट असल्याचे भाजप पाचवी जाका लढवत असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी सहाव्या जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता भाजप विधानपरिषदेसाठी पाच जागा लढवत आहे. विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न  होता. मात्र, काँग्रेस उमेदवार मागे घेण्यास तयार नसल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार नाही. परुंतु आता खोत यांच्या माघारी नंतर निश्चित पाचवी जागा निवडून आणू, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

विधानपरिषदेसाठी भाजपाकडून कोण आहेत उमेदवार?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number