‘चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र या’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेले अनेक दिवस सत्तासंघर्षवर चर्चा सुरूच होती. सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले होते. अखेरीस गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. या निकालाच्या पार्श्ववभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नितीश कुमार, शरद पवार, यादव यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजपा विरोधकांना एकत्र काम करण्याची […]

‘चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र या’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेले अनेक दिवस सत्तासंघर्षवर चर्चा सुरूच होती. सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सर्वांचेच डोळे लागले होते. अखेरीस गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला आहे. या निकालाच्या पार्श्ववभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नितीश कुमार, शरद पवार, यादव यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलत असताना भाजपा विरोधकांना एकत्र काम करण्याची गरज असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. तर, देशाच्या बहुसंख्य भागात भाजपाविरोधी वातावरण असल्याचेही ते म्हणाले. तसेच, चेहरा नंतर ठरवू, आधी एकत्र या असं विधानही त्यांनी केलं आहे. तर, न्यायालयाने अध्यक्षांना कुठलीही कालमर्यादा घातली नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी देशाच्या नेतृत्वासाठी पुढाकार घ्यावा असा आग्रह नितीश कुमार यांनी पवारांना केला. परंतु, नितीश यांचा हा आग्रह पवारांनी नाकारला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number