डॉक्टरांचा तुटवडा; शिपाई-वॉचमन बनले डॉक्टर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिकमध्ये देवगांव शासकीय आश्रम शाळेतल्या 8 मुलींची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एकही कर्मचारी नव्हता. आश्रम शाळेत शिक्षकही हजर नसल्याने श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं. या मुलींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती मिळतेय. या मुलींवर वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. मात्र, या आरोग्य केंद्रातही उपचार करण्यासाठी […]

डॉक्टरांचा तुटवडा; शिपाई-वॉचमन बनले डॉक्टर

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिकमध्ये देवगांव शासकीय आश्रम शाळेतल्या 8 मुलींची अचानक प्रकृती बिघडली. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी एकही कर्मचारी नव्हता. आश्रम शाळेत शिक्षकही हजर नसल्याने श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रुग्णालयात नेलं.

या मुलींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची माहिती मिळतेय. या मुलींवर वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. मात्र, या आरोग्य केंद्रातही उपचार करण्यासाठी एकही वैदकीय आधिकारी नाहीत.

रुग्णालयातील नर्स, शिपाई आणि वॉचमेन या मुलींवर उपचार करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number