जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
बिबट्याची दहशत आता हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडा परिसरात बिबट्याचे दर्शन झालंय. निफाड तालुक्यातील एका पोल्ट्री फॉर्ममधील सीसीटीव्हीत हा बिबट्या कैद झालाय. या बिबट्यानं पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या फस्त केल्याचं समजल जातयं.
गुरूवारी सकाळी साडेचारच्या सुमारास हा बिबट्या पोल्ट्री फॉर्ममध्ये शिकला होता. सुरूवातीला अख्ख पोल्ट्री फॉर्ममध्ये फिरला नंतर त्याने तिथल्या कोंबड्यावर झडप घातली.