Leopard in Mumbai : धक्कादायक! मुंबईत भरवस्तीत शिरला बिबट्या, कुत्र्याची केली शिकार आणि… Video Viral

या भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरिकांची झोप उडाली आहे.

Leopard in Mumbai : धक्कादायक! मुंबईत भरवस्तीत शिरला बिबट्या, कुत्र्याची केली शिकार आणि… Video Viral

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरिकांची झोप उडाली आहे.

साई प्रस्थ येथे आलेल्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. मात्र त्या ठिकाणी रात्री अपरात्री एखादी व्यक्ती असती तर त्याची शिकार झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात असून, परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.

जुहू येथील एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केले आहे. बेकायदेशीर रित्या हे प्राणी घरात ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर वन विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांच युनिट-9 आणि सर्प इंडिया NGO यांची संयुक्त कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इम्रान शेखवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number