उसाच्या फडात सापडले बिबट्याचे बछडे

आयटी पार्क हिंजवडी शेजारील पंचक्रोशीत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने बिबट्याचा वावर आढळला आहे. गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले तर पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना देखील घडली असताना सोमवारी पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याची मादी जातीचे तीन बछडे आढळून आले. हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्रीजवळ असलेल्या गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे […]

उसाच्या फडात सापडले बिबट्याचे बछडे

आयटी पार्क हिंजवडी शेजारील पंचक्रोशीत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने बिबट्याचा वावर आढळला आहे. गेल्या वर्षी नेरे येथील शेतकऱ्याच्या दोन वासरांना बिबट्याने ठार केले तर पाच कोंबड्या फस्त केल्याची घटना देखील घडली असताना सोमवारी पुन्हा नेरे येथील उसाच्या फडात बिबट्याची मादी जातीचे तीन बछडे आढळून आले. हिंजवडी आयटी पार्कच्या फेज थ्रीजवळ असलेल्या गावात ही घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुत्र्याला साखळीने बांधून ठेवलेलं असतानाही बिबट्याने त्याच्यावर हल्ला करुन कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा तोडून त्याची शिकार केली.

लोकसंख्या वाढल्याने मानवी वस्ती अगदी जंगलांच्या सीमांपर्यंत वाढली आहे. मात्र यामुळे मानव आणि जंगली प्राण्यांच्या संघर्षामध्ये वाढ होताना दिसत आहे. अर्थात या संघर्षाचा तोटा मानवाबरोबर प्राण्यांनाही होत आहे. अनेकदा जंगली जनावरे अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत प्रवेश करतात आणि त्यानंतर संघर्ष झाल्याचं पहायला मिळतं. मागील काही वर्षांपासून असा संघर्षाच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. अनेक ठिकाणी तर हिंसक जंगली प्राण्यांची दहशत इतकी आहे की सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये अनेकदा हे प्राणी मानवी वस्तीत फिरताना दिसतात. असाच काहीसा प्रकार पुण्यातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक बिबट्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार करताना दिसत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पुणे जिल्ह्यातील हिंजवडीजवळच्या नेरे गावातील शिंदे वस्तीमधील आहे. येथील नेरे गावामध्ये हा सारा प्रकार घडला. कान्हे येथील महिंद्रा स्पेअर्स कंपनीजवळून हा बिबट्या रस्त्यावरुन पळत असल्याचं एका सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची चर्चा मागील अनेक आठवड्यांपासून होती. बिबट्याची दहशत असल्याने रात्रीच्यावेळी या ठिकाणी कोणी एकटं बाहेर पडत नाही. मात्र आता या भागातील पाळीव प्राणीही सुरक्षित नसल्याचं नुकत्याच घडलेल्या घटनेमधून दिसून येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number