Pune Leopard Attack: भीतीचं सावट ! शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, प्रतिकार केला पण…

या दोन्ही घटनांनी राज्यातील वाढता वन्यजीव आणि मानव संघर्ष याचसोबत वन्यप्राण्यांचा वस्तीभागातील वाढता वावर गंभीर समस्या बनल्याचे स्पष्ट केले आहे.

Pune Leopard Attack: भीतीचं सावट !  शाळकरी मुलावर बिबट्याचा हल्ला, प्रतिकार केला पण…

पुण्यातील खेड तालुक्यातील निमगाव येथे शाळकरी मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भोंडवेवस्तीत शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालत यश गणेश भोंडवे या मुलाला जखमी केलं. मुलावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. राज्यभरात वन्यप्राण्यांची वाढती हालचाल आणि मानवी वस्तीत त्यांचा अचानक होणारा वावर ही चिंतेची बाब ठरत आहे.

अकोला शहरातील न्यू तापडियानगर परिसरात देखील बिबट्याच्या दहशदीमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. सुरुवातीला वनविभागाने या दाव्याचे खंडन केले होते. परंतु पगमार्क आणि इतर मिळालेल्या पुराव्यांनी घरात प्रवेश करणारा प्राणी बिबट्याच असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: Education : 'नोकरीच्या अपेक्षेने येऊ नका…', जर्मनीत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इशारा

पोलिस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरात जिन्याजवळ बसलेला बिबट्या त्यांच्या सासूच्या नजरेला पडला आणि त्यानंतर खिडकीच्या काचा फोडून तो पळून गेला. या घटनेनंतर वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

या घटनांनी एकच मोठा प्रश्न अधोरेखित केला आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर नेमका का वाढतोय? त्यांचा जंगलातील अधिवास कमी होतोय का? मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष आता गंभीर स्वरूप धारण करत चालला आहे. नागरिकांची सुरक्षितता, गावांतील मुलांचे रक्षण आणि वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय याबाबत दीर्घकालीन धोरणांची गरज स्पष्टपणे दिसत आहे.

वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन केले असले तरी या घटनांनी राज्यानुसार आधुनिक काळातील मानव प्राणी संघर्षाचे स्वरूप अधिक उघड केले आहे. समस्या केवळ एका गावाची किंवा एका जिल्ह्याची नसून संपूर्ण राज्यासाठी विचार करायला लावणारी बनली आहे.

हेही वाचा: Smriti Mandhana Wedding: स्मृतीच्या मंधानाच्या लग्नात मोजक्यांनाच प्रवेश, दिग्गजांना प्रवेश नाही?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number