Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या त्या सीनमुळे अडचणीत वाढ; धुरंधर 2 चित्रपटाच्या निर्मात्याला शीख समुदायानं पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंग, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्यासह इतर कलाकारांची भूमिका असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पुढील आठवड्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, गुरुवार 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 18 मार्च रोजी या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. मात्र अधिकृत प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात रणवीर सिंगच्या भूमिकेवर शीख समुदायाने आक्षेप घेतला असून हा […]

Dhurandhar 2 : रणवीर सिंगच्या त्या सीनमुळे अडचणीत वाढ; धुरंधर 2 चित्रपटाच्या निर्मात्याला शीख समुदायानं पाठवली कायदेशीर नोटीस

बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंग, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्यासह इतर कलाकारांची भूमिका असलेला 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पुढील आठवड्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, गुरुवार 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 18 मार्च रोजी या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू आयोजित करण्यात आला आहे. मात्र अधिकृत प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटात रणवीर सिंगच्या भूमिकेवर शीख समुदायाने आक्षेप घेतला असून हा चित्रपट शीख समुदायाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते विकी थॉमस सिंग यांनी चित्रपटाच्या निर्माता-दिग्दर्शकाविरुद्ध तसेच शीख पात्र साकारणाऱ्या अभिनेता रणवीर सिंगविरुद्ध सीबीएफसी (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

हेही वाचा : Badshah Death Threat: 'पुढच्या वेळी थेट कपाळावर गोळी घालू…'; रॅपर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

या नोटीसमध्ये असे म्हटले आहे की, शीख समुदाय तंबाखूचे सेवन करत नाही. शीख धर्मात तंबाखू आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. परिणामी, चित्रपटात असे दृश्य दाखवणे केवळ धार्मिकदृष्ट्या असंवेदनशील नाही तर संपूर्ण शीख समुदायाच्या धार्मिक भावनांचा अपमान आहे. विकी थॉमस सिंग यांनी मागणी केली आहे की, चित्रपटातून शीख पात्राचे धूम्रपान करतानाचे सर्व दृश्य तात्काळ काढून टाकावी. शिवाय, त्यांनी सर्व संबंधीत पोस्टर्स, ट्रेलर आणि इतर प्रचारात्मक साहित्यांमधून असे दृश्ये काढून टाकण्याची विनंती केली आहे. या नोटीसमध्ये चित्रपटातील सर्व निंदनीय, आक्षेपार्ह आणि धार्मिकदृष्ट्या असंवेदनशील मजकूर तात्काळ काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शीख लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी दृश्ये आणि प्रचारात्मक साहित्य समाविष्ट केल्याचा उल्लेख करून शीख समुदायाची जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. 

चित्रपटात रणवीर सिंग जसकीरत सिंग रंगी नावाच्या काल्पनिक गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. हा पाकिस्तानमधील शत्रूंच्या वर्तुळात घुसखोरी करण्यासाठी आणि भारतात गुप्त माहिती परत पाठवण्यासाठी हमजा अली मजारी हे पात्र उभं करतो. चित्रपटाच्या पहिल्या भागात जसकीरत सिंग रंगी एका कैद्याच्या भूमिकेत दाखवण्यात आला होता. ज्याला प्रशिक्षणानंतर पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात जसकीरत सिंग रंगीच्या आयुष्याशी संबंधीत अनेक रहस्य उलगडणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number