मुंबई, १८ मे २०२३, प्रतिनिधी : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात अली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १८ जुलै रोजी सोडत काढण्यात येईल. वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरु होती. मात्र अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता मंडळानं ४ हजार ८३ घरांचं सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मुंबईतील पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे. या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली असून ४०८३ घरांसाठी २२ मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. एकूण घरे ४०८३ असणार आहेत. यात अत्यल्प – २७८८, मध्यम- १३२, उच्च – ३८, विखुरलेली – १०२ अशी घरे असणार आहेत. जाहिरात २२ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवसापासून नोंदणी करता येणार आहे. अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख २६ जून आहे. तर सोडतीचे ठिकाण रंगशारदा, वांद्रे, पश्चिम आहे. घरांची सोडत १८ जुलै २०२३ रोजी काढण्यात येणार आहे.