राज्यातील १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीला मुहूर्त मिळला आहे. येत्या १३ जून रोजी मनपा निवडणूक आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात ओबीसी आरक्षणावर गडांतर आल्याने सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
राज्यात मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर या मनपा क्षेत्रात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडणार आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणावर ४ मे रोजी सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. रखडलेल्या निवडणुका दोन आठवड्यात घोषित करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने मविआला दिली आहे. तसेच न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मनपाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याबाबत कार्यक्रम दिला होता, त्याला शासन राज्य पत्रात प्रसिद्धी करण्यात आली आहे.