वकील सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका

शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील आणि कारकर्त्या सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका झाली आहे. पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुधा भारद्वाज यांची सुटका झाली असून अटी शर्तींवर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निर्णयात […]

वकील सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका

शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील आणि कारकर्त्या सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका झाली आहे. पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुधा भारद्वाज यांची सुटका झाली असून अटी शर्तींवर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे.

एनआयएने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने पहिल्या सुनावणीत उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचे कोणतीही प्राथमिक कारण दिसत नसल्याचे सांगत याचिका फेटाळली. यामुळे एनआयएला मोठा झटका बसला आहे.

न्यायालयाने अटी-शर्तींसह वकील सुधा भारद्वाज यांना जामीन मंजूर केला आहे. या अटींमध्ये प्रथम अट म्हणजे सुधा भारद्वाज यांना विना परवानगीशिवाय मुंबईबाहेर जाता येणार नाही. तसेच त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय न्यायालयाने यूएपीए अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याप्रमाणे बेकायदेशीर बाबींमध्ये पुन्हा न गुंतण्याची ताकीदही न्यायालयाने वकील सुधा भारद्वाज यांना दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number