लॉरेन्स बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिलेली धमकी प्रचंड व्हायरल होत आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने दिलेली धमकी प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बिश्नोईच्या टोळीने लिहिले आहे की, 'पहलगाम हल्ल्यामध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या हत्येचे प्रत्युत्तर देण्यासाठी, आम्ही पाकिस्तानमध्ये प्रवेश करू आणि अशा एका माणसाला मारू ज्याची किंमत 1 लाख रुपये असेल'. या पोस्टमध्ये, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा फोटो आहे, ज्यावर क्रॉसचे चिन्ह आहे. सध्या, ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतामध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या गुन्ह्यांची जबाबदारी घेतली आहे. त्याच्या या पोस्टमध्ये किती सत्यता आहे आणि ही पोस्ट बिश्नोईच्या टोळीने केली आहे का, याची माहिती अद्याप अस्पष्ट असली तरीही ही पोस्ट सोशल मीडियावर पसरत आहे.

हेही वाचा: मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही हे अर्धसत्य; शरद पवारांचं स्पष्टीकरण

पाकिस्तानी कनेक्शन असल्याचा लॉरेन्स बिश्नोईवर आरोप

बऱ्याचदा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीवर पाकिस्तानी गुंड आणि तिथल्या डॉनसोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेकदा पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे पाकिस्तानसोबत संबंध असल्याचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र, कारागृहातून लॉरेन्स बिश्नोईच्या कथित मुलाखतीमध्ये त्याने ही गोष्ट नाकारली आहे. स्वतःला देशभक्त म्हणणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने वारंवार असा दावा केला आहे की त्यांचे पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध नाहीत.

गेल्या वर्षी, लॉरेन्स बिश्नोईचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो पाकिस्तानी डॉन शहजाद भट्टीला ईदच्या शुभेच्छा देत होता. इतकंच नाही तर ड्रोनच्या मदतीने पाकिस्तानमधून टोळीतील शूटर्सना शस्त्रे देखील पुरवली जातात. जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यासाठी पाकिस्तानातून आयात केलेल्या एके-47 रायफलव्यतिरिक्त 30 बोर आणि 9 एमएम पिस्तूलचा वापर करण्यात आला होता.

लॉरेन्स बिश्नोईची टोळी हाफिज सईदला मारू शकेल का?

सध्या, लॉरेन्स बिश्नोई तुरुंगामध्ये आहे. मात्र, तो अजूनही त्याची टोळी चालवत आहे. अशा परिस्थितीत, हाफिज सईदला मारण्याबाबत व्हायरल पोस्ट जरी खरी मानली जात असली तरीही, गेल्या अनेक वर्षांपासून भारतावर खोलवर जखमा करणाऱ्या मोस्ट वॉन्टेड हाफिज सईदला लॉरेन्स बिश्नोई मारू शकेल का? जागतिक स्तरावर गुन्हेगारी करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईची टोळी ही काही छोटी टोळी नाही. या टोळीचे नेटवर्क प्रचंड मोठे आहे. विशेषतः कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचे मजबूत संबंध आहेत. गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये त्याचा समान भागीदार गोल्डी ब्रार आहे.

2022 मध्ये, भरदिवसा पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची हत्या, त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकीची हत्या आणि मग अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेला हल्ला या काही प्रमुख घटना आहेत, ज्यामुळे अलिकडच्या काळात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची भीती वाढली आहे. उत्तर अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवाद्यांसोबत आणि खलिस्तानी फुटीरतावादी गटांसोबत लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीची घनिष्ट मैत्री आहे. अनेक देशांमध्ये बिश्नोई टोळीचे जाळे पसरलेले आहे. यांच्या टोळीमध्ये 700 पेक्षा अधिक शार्प शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीला पंजाबमधील सर्व शहरांमधून शस्त्रे मिळतात. त्यासोबतच, अमेरिका, रशिया, कॅनडा आणि नेपाळमधूनही या टोळीला शस्त्रे मिळतात. खंडणीच्या माध्यमातून ही टोळी कोट्यवधी रुपये कमावते आणि ते सर्व पैसे हवालाद्वारे परदेशात पाठवले जातात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number