Bharti Singh Second Baby : ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई! गोलाला भाऊ की बहीण…

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचे पती, लेखक-होस्ट हर्ष लिंबाचिया यांच्या घरात छोट्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे. भारती आणि हर्ष हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.

Bharti Singh Second Baby  : ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई! गोलाला भाऊ की बहीण…

कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचे पती, लेखक-होस्ट हर्ष लिंबाचिया यांच्या घरात छोट्या पाहुण्याचे स्वागत झाले आहे. भारती आणि हर्ष हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांना दुसऱ्यांदा देखील पुत्रप्राप्ती झाली आहे. याआधी भारती आणि हर्ष यांना पहिले बाळ देखील मुलगाच झाला होता, ज्याला सगळे गोला म्हणून ओळखतात.

हेही वाचा- Nidhi Agarwal Viral Video: साऊथच्या अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार; व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्सचा संताप

त्यानंतर दुसऱ्यांदा देखील त्यांच्या घरात छोट्या गोलाचं स्वागत केलं जात आहे. तर आता तिने वयाच्या 41 व्या वर्षी पुन्हा एकदा एका मुलाला जन्म दिला आहे. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा विवाह 2017 मध्ये पार पडला. त्यानंतर 2022 मध्ये त्यांना पहिली पुत्रप्राप्ती झाली. ज्याच नाव त्या दोघांनी लक्ष्य ठेवलंअसून त्याला भारती आणि हर्षचे मित्र-परिवार तसेच चाहते गोला या नावाने ओळखू लागले.

हेही वाचा- Dhurandhar Rapper Flipperachi : रहमान डकैतच्या एन्ट्रीचं रॅप गाणाऱ्याने अद्याप 'धुरंधर' पाहिलाच नाही; कारणही आलं समोर

त्यानंतर आता भारतीने 19 डिसेंबर 2025 रोजी मुलाला जन्म दिला आहे. या गुडन्यूजमुळे भारती आणि हर्ष या दोघांवरही कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच सिनेकलाकार आणि भारतीचे चाहते दोघांच्या सोशल मीडियावर त्यांना मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करत शुभेच्छा देत आहेत. यादरम्यान भारती तसेच हर्ष यादोघांनीही अद्याप त्यांच्या सोशल मीडियावर कोणतीही माहिती दिली नाही. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number