Latur: बळीराजाची थट्टा! सरकारने दिलेला बैल औत लावताच कोसळला, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

हाच शासनाने शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने बैलाची शेतकऱ्याला मदत होण्याऐवजी शासनाने दिलेल्या बैलावरच शेतकऱ्याला उपचार करण्याची वेळ आली आहे. 

Latur: बळीराजाची थट्टा! सरकारने दिलेला बैल औत लावताच कोसळला, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती

वीज कोसळून बैल दगावल्याने आणि नवीन बैल खरेदी करण्याची ऐपत नसल्याने लातूरच्या देवणी तालुक्यातील बोंबळी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या पत्नीलाच नांगराला जुंपल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्यानंतर काशिनाथ गायकवाड या शेतकऱ्याला शासनाने तात्काळ गोशाळेतील बैल देऊन त्याला मदत केली. पण आता हाच शासनाने शेतकऱ्याला दिलेला बैल आजारी निघाल्याने बैलाची शेतकऱ्याला मदत होण्याऐवजी शासनाने दिलेल्या बैलावरच शेतकऱ्याला उपचार करण्याची वेळ आली आहे. 

शासनाने दिलेल्या बैलाच्या मदतीने शेतकरी शेतात मशागत करत असताना बैल अचानक जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याची पशुवैद्यकीय तपासणी केली असता तो आजारी असल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला सरकारने केलेली मदत खोटी असून हे सरकार फसवे असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number