अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार, दोन महिलांना खाऊ घातलं शेण

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर   अंधश्रद्धेच्या नावाखाली दोन महिलांना चक्क शेण खाऊ घातल्याची अघोरी घटना लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या धनगरवाडीमध्ये घडली. त्यासोबतच या घटनेचा व्हिडीओ तयार करून क्लिप सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आली.   या प्रकरणी व्हिडिओत दिसत असल्या प्रमाणे एका सतरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला जबरदस्तीने कोणाची तरी नावे घेण्यास भाग पाडण्यात […]

अंधश्रद्धेच्या नावाखाली धक्कादायक प्रकार, दोन महिलांना खाऊ घातलं शेण

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

अंधश्रद्धेच्या नावाखाली दोन महिलांना चक्क शेण खाऊ घातल्याची अघोरी घटना लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या धनगरवाडीमध्ये घडली. त्यासोबतच या घटनेचा व्हिडीओ तयार करून क्लिप सोशल मीडियावर व्हायरल देखील करण्यात आली.

 

या प्रकरणी व्हिडिओत दिसत असल्या प्रमाणे एका सतरा वर्षीय मुलीला आणि एका महिलेला जबरदस्तीने कोणाची तरी नावे घेण्यास भाग पाडण्यात आलं. नंतर या दोघीना चक्क शेण खाऊ घालण्यात आलं. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. प्रभाकर केसाळे, पंडित कोरे, गंगाधर शेवाळे, दगडू शेवाळे, कलूबाई कोरे या पाच जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number