मांजरा नदी पात्रात आढळली दिडशे किलोची मगर

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मांजरा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. यामुळे नदी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलयं. यापूर्वी देखील मांजरा नदीच्या पात्रातून तीन मगरींना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय. पुन्हा एकदा देवणी तालुक्यातील बटनपुर येथे सरपंचांच्या शेतातील पाण्याच्या खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती […]

मांजरा नदी पात्रात आढळली दिडशे किलोची मगर

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील मांजरा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून मगरीचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. यामुळे नदी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलयं. यापूर्वी देखील मांजरा नदीच्या पात्रातून तीन मगरींना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडलंय. पुन्हा एकदा देवणी तालुक्यातील बटनपुर येथे सरपंचांच्या शेतातील पाण्याच्या खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली असता मगरीला यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलंय.

मात्र, या आठ फूट आणि दिडशे किलोची मगरीला बाहेर काढण्यात प्राणिमित्रांची चांगलीच दमछाक झाली. तर पाच तास अथक मेहनत करावी लागली ते वेगळंच. नदी किनाऱ्यावरील शेतात अनेक पशुपक्ष्यांची या मगरीनं शिकार केल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number