Latur Crime: शिक्षकाची क्रूरता! मतिमंद मुलाला शाळेतच जबर मारहाण, धक्कादायक घटनेने लातूर हादरलं

एका मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Latur Crime: शिक्षकाची क्रूरता!  मतिमंद मुलाला शाळेतच जबर मारहाण, धक्कादायक घटनेने लातूर हादरलं

शिक्षक एका मुलाचे भवितव्य घडवत असतो. पण तोच शिक्षक विद्यार्थ्याला अंधारात ढकलत असेल तर? हो असाच काहीसा प्रकार घडला आहे. लातूरमध्ये एका मतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

लातूरच्या अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयातील एका विद्यार्थ्याला शिक्षकाने फळी तुटेपर्यंत मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली तो शाळेतील अन्य विद्यार्थ्यांना शुल्लक कारणावरून सतत त्रास देत होता. 

त्यामुळे त्याला जरब देण्यासाठी शिक्षकाने त्याला शिक्षा दिल्याचे सांगितले जात आहे. सदरचा व्हिडिओ हा शाळेतील अंतर्गत मतभेदातून व्हायरल करण्यात आल्याचे समाज कल्याण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 शिक्षकाच्या मारहाणीनंतर तो विद्यार्थी मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहे. नंतर काही शिक्षकांनी त्याला शांत करण्याचादेखील प्रयत्न केला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number