वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जर तुम्ही एखाद्या चांगल्या स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एचटीसी घेऊन आलं आहे एचटीसी U12+ हा हटके स्मार्टफोन ज्यामध्ये तुम्हाला हवे असणारे सर्व फिचर्स उपलब्ध आहेत. हा परिपूर्ण असा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये तब्बल 4 कॅमेरे उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन ट्रांसलूसेंट ब्लू, सिरॅमिक ब्लॅक आणि फ्लेम रेड या 3 कलर्स मध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन सध्या अंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 2 वेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, तर जाणून घेऊया या जबरदस्त स्मार्टफोनचे फीचर्स.
एचटीसी U12+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
6 इंचचा क्वॉडकोर फुल एचडी प्लस सुपर एलसीडी 6 डिस्प्ले
आईपी – 68 रेटेड वॉटर आणि रेसिस्टेंट स्क्रीन
2 फ्रंट आणि 2 बॅक असे 4 कॅमेरे
साउंड क्वालिटी वाढवण्यासाठी बूम साउंड स्पीकर
गुगल असिस्टेंसशिवाय अमेजनचा वॉयस असिस्टेंस एलेक्सा
मेमरी 6 जीबी रॅमसह 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज
16 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंससह एचटीसी अल्ट्रापिक्सल 4 सेंसर
फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सल डुडल कॅमेरा
3,500 एमएएचची बॅटरी 57,732 रुपये
64 जीबी स्टेरेजच्या वेरिएंटची किंमत 799 अमेरिकी डॉलर (54,332 रुपये)
128 जीबी स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत 849 अमेरिकी डॉलर (57,732 रुपये)