“हाजी अराफत गद्दार!” स्व. साबिर शेख यांच्या मुलीचा आरोप

शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपाची वाट धरली. या पक्षबदलाबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली ती कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. साबिर शेख यांची कन्या आफरीन हिनं. “हाजी अराफत या व्यक्तीने माझ्या वडिलांच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी चालवला आहे. हाजी अराफत आमचा नातलग नाही”, असा खुलासा करतानाच साबिर […]

“हाजी अराफत गद्दार!” स्व. साबिर शेख यांच्या मुलीचा आरोप

शिवसेनेचे उपनेते आणि वाहतूक संघटनेचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपाची वाट धरली. या पक्षबदलाबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिली ती कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. साबिर शेख यांची कन्या आफरीन हिनं. “हाजी अराफत या व्यक्तीने माझ्या वडिलांच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी चालवला आहे. हाजी अराफत आमचा नातलग नाही”, असा खुलासा करतानाच साबिर भाईंच्या नावाचा वापर करणारा हाजी अराफत हा गद्दार असल्याचा आरोप आफरीननं केला.

यापूर्वी हाजी अराफत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक होते. मात्र काही वर्षांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देत ‘शिवबंधन’ बांधत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना नेतेपदही बहाल केलं. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या प्रसारित करताना काही प्रसारमाध्यमांनी हाजी अराफत हे माजी कामगारमंत्री स्वर्गीय साबीर शेख यांचे पुतणे असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं.

याबाबत माजी कामगारमंत्री स्व. साबीरभाई शेख यांची कन्या आफ्रिन चौगुले यांनी कल्याण शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हाजी अराफत आमचे नातलग नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “या व्यक्तीने माझ्या वडिलांचा नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी चालवला आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहेत माझा चुलत भाऊ अल्ताफ शेख असून त्यांना शिवसेनेने उपनेतेपद देऊन आमच्या कुटुंबियांचा सन्मान केला आहे. याचा खुलासा अल्ताफ शेख करणार होते मात्र ते हज यात्रेला गेले आहेत.” असं आफरीन यांनी स्पष्ट केलं.

वडिलांनी आम्हाला गाडी, बंगला, संपत्ती दिलं नाही, मात्र संस्कार आणि श्रीमंती दिली, असं आफरीन यांनी सांगितलं.

‘मला शिवसेना सोड, असं माझ्या धर्माने सांगितलं तर मी धर्म सोडेन पण शिवसेना सोडणार नाही’ असं स्व. साबिर भाई नेहमी म्हणायचे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी निष्ठा जपली. ठाण्याच्या सभेत शिवसेनाप्रमुखांनीही याचा उल्लेख केला होता. अशा साबिर भाई यांच्या नावाचा वापर करणारा हा गद्दार हाजी अराफत साबीर भाईंचा किंवा आमच्या कुटुंबियांचा नातलग लागत नाही, असं आफरीन यांनी निक्षून सांगितलं.

 

संबंधित बातम्या 

हाजी अराफत यांची शिवसेनेला सोडचिठ्ठी!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number