जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती स्थळावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजप अध्यक्ष अमित शहा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी आदी नेत्यांनी तसंच तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी 300 जवानांनी वाजपेयींना मानवंदना दिली.
पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान इत्यादी देशांच्या प्रतिनिधींनीही वाजपेयींना श्रद्धांजली अर्पण केली.
वाजपेयी यांची मानसकन्या नमिता कौल- भट्टाचार्य यांनी सायंकाळी 4.55 वाजता हिंदू पद्धतीने मंत्राग्नी दिला. देशाचे लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन झाले.
वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics
वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…
वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी
वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण
राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…
जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…
वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…
वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…
अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं
वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…
वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!
भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…
अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…