लासलगाव जळीतकांड : पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

लासलगाव जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या पीडितेची ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती. या पीडितेवर मुंबईमध्ये उपचार सुरु होते. मुंबईतील मसिना रुग्णालयात या पीडितेवर उपचार सुरु होते. शुक्रवारी रात्री एक वाजता या पीडितेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पीडितेचं […]

लासलगाव जळीतकांड : पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू

लासलगाव जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या पीडितेची ६ दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु होती.

या पीडितेवर मुंबईमध्ये उपचार सुरु होते. मुंबईतील मसिना रुग्णालयात या पीडितेवर उपचार सुरु होते.

शुक्रवारी रात्री एक वाजता या पीडितेने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

जेजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदन केल्यानंतर पीडितेचं मृतदेह लासलगाव येथे पाठवला जाणार आहे.

मुळगावी पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पीडितेच्या मृत्युमुळे संपूर्ण लासलगाववर शोककळा पसरली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रमुख आरोपीला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान याआधी काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number