मुंबईतला प्रसिद्ध लालबागचा राजा यंदाचा पर्यावरण वाचविण्याचा संदेश देणारा आहे.
गणेशोत्सवाच्या तयारीत संपूर्ण मुंबापुरी न्हाऊन निघाली आहे. यात सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, ते लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे…
नवसाला पावणारा राजा म्हणून ख्याती असणार्या लालबागच्या राजा सार्वजनिक मंडळाचे यंदाची तयारी कशी असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली.
लालबागचा राजा गणेशोत्सव 2018 चे उद्घाटन गुरुवारी 13 सप्टेंबर 2018 रोजी, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते सकाळी 4.00 वाजता होणार आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठापना पूजाही घेण्यात येणार आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन सकाळी 9.00 वाजल्यापासून सर्व भक्तांसाठी खुले करण्यात येईल आणि 2018 साठी लालबागचा राजा स्मरणिका’ प्रकाशित करण्यात येईल.
असे आहे नियोजन –
लालबागचा राजा 2018 दर्शन :
- सर्व भक्तांसाठी लालबागच्या राजाचे दर्शन पहाटे सकाळी 6 वाजल्यापासून, गुरुवार 13 सप्टेंबर 2018 पासून शनिवार 22 सप्टेंबर, 2018 पर्यंत 24 तास उपलब्ध असेल.
लालबागचा राजा 2018 चरणस्पर्श :
- लालबागचा राजाचे चरणस्पर्शासाठी सकाळी 6.00 वाजल्यापासून गुरुवार 13 सप्टेंबर 2018 पासून 24 तासांसाठी उपलब्ध असेल.
- शनिवार दिनांक 22 सप्टेंबर, 2018, सकाळी 10.00 वाजता बंद होईल.
चरणस्पर्शासाठी पुढील मार्गांचा अवलंब करा :
- दिनशाॅ पेटिट लेन – जी.डी.आंबेकर मार्ग येथे पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेवर लोअर परेल स्टेशन आणि सेंट्रल लाइनवर करी रोड स्टेशन आहे.
लालबागचा राजा 2018 मुखदर्शन :
- मुखदर्शन पहाटे 6.00 वाजल्यापासून गुरुवार दिनांक 13 सप्टेंबर 2018 पासून, शनिवार दिनांक 22 सप्टेंबर, 2018 पर्यंत 24 तासांसाठी घेता येणार आहे.
- मात्र शनिवार दिनांक 22 सप्टेंबर, 2018 मध्यरात्री 12.00 नंतर बंद राहतील.
मुखदर्शन मार्ग :
- छत्रपती शिवाजी ग्राउंड – डॉ. बी. ए. रोड – दत्ताराम लाड मार्ग – टी.बी. कदम मार्ग – अॅड.एल. सी.पी. कार्यालय- डॉ.बी.ए.रोड- मध्य रेल्वेवर राणी बाग. येथे पोहोचण्यासाठी चिंचपोकळी किंवा भायखळा स्टेशन वरून येऊ शकता.
- मुखदर्शन रांग हार्बर रेल्वेवर काॅटन ग्रीन स्थानकवरून पोहचू शकता.